सकाळी 9:30 वाजेपर्यंत कार्यालयात या; मोदींचे मंत्र्यांना आदेश

0

नवी दिल्ली: मोदी मंत्रीमंडळाचा शपथ विधी झाल्यानंतर आपापली खाती सांभाळून मंत्रीगण कामला लागले आहे. मोदी मंत्रीमंडळाचा दुसरा पार्ट सुरु झाला असून, कामात तत्परता आणण्यासाठी मोदींनी नवीन फर्मान काढले आहे. सर्व मंत्र्यांनी सकाळी ९:३० पर्यंत आपल्या कार्यालयात येऊन कामाला सुरुवात करावी, व घरी बसून काम करू नये असे त्यांनी नवीन मंत्र्यांना सांगितले आहे. तसेच संसदेचे कामकाज चालू असताना कुणीही बाहेरचे दौरे काढू नये असेही त्यांनी सांगितले आहे.

मी गुजरातचा मुख्यमंत्री असतांना सकाळी लवकर कार्यालयात पोचत होतो असेही त्यांनी नवीन मंत्रीमंडळाच्या बैठकीत सांगितले. जे नवीन खासदार निवडून आले आहे त्यांना मंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे असे फर्मान त्यांनी सोडले आहेत. येत्या ५ वर्षाचा आपल्या कामाचा कार्यक्रम आखून त्यानुसार कामाला लागून त्याचा परिणाम येत्या १०० दिवसात दिसायला पाहिजे असेही त्यांनी मंत्र्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत मार्च २०१९ च्या उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षणासंदर्भातील नव्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. या द्वारे ७००० शिक्षकांची भरती केली जाणार आहे.