सखाराम मोते यांना अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी गौरव

0

शहादा । येथील शिवसेना जिल्हा उपप्रमुख सखाराम मोते याना धुळे येथे आयोजित भव्य कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड 2018 यात अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सखाराम मोते यानी शहादा तालुक्यातील वाघर्डे येथील गोमाई नदीवर स्वखर्चाने 50 हजार रुपये खर्चुन बंधारा बांधला. गावातील ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन बंधारा पूर्ण केला. बंधार्‍याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील विंधन विहीरी तसेच विहीरींचा पाण्याची पातळी वाढली. गुराना पिण्यासाठी पाण्याची सोय झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

एकूण 31 शेतकरी व कार्यकर्ते सन्मानित
शेतीला देखील मुबलक पाणी मिळु लागल्याने शेतकर्‍यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे. पाणी, माती व मृदु संधारण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याची दखल घेत भव्य व कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड 18 तर्फे सखाराम मोते यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाणी माती व मृदु संधारण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या महाराष्ट्रातील एकूण 31 शेतकरी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला यात नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा उपप्रमुख सखाराम मोते यांच्या समावेश होता.