सख्ख्या भावाचा खून, आरोपीला पोलीस कोठडी

0
भुसावळ :- मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाचाच लहान भावाने खून केल्याची घटना गुरुवारी घडली होती. या प्रकरणी अटकेतील आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील खडका रोड भागातील मोहम्मदी नगर भागात मालमत्तेच्या वादातून जावेदअली गुलामअली (29) या युवकाचा त्याचा लहान भाऊ तथा व्यवसायाने रीक्षा चालक वाहेदअली गुलामअली (27) याने सुरा मारून खून केला होता. आरोपीस शुक्रवारी न्या.पी.ए.पाटील यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता त्यास सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सरकार वकील अ‍ॅड.नवाब अहमद यांनी युक्तीवाद केला. पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी बाजू मांडली.