मिर्झापुर: २०१९च्या निवडणुकीत दिवसेंदिवस अधिक रंग चढत असून, राजकारणाच्या बाहेरील नागरिकाना या निवडणुकीच्या प्रचारात ओढले जात असल्याचे पाहिले जात आहे. कुणी नथुराम गोडसेचे समर्थन करत आहे.
आता या निवडणुकीत देशाचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नावाचा उल्लेख आला असून, तो उल्लेख कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वडेरा यांनी मिर्झापुर येथील प्रचार सभेत केला आहे. त्यांनी या सभेत म्हटले आहे की, आता आपण समजले असणार कि तुम्ही जगातील सगळ्यात मोठ्या कलाकाराला पंतप्रधान बनवले. त्यापेक्षा जर तुम्ही अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान बनवले असते तर चालले असते. परंतु कुणीही आपल्यासाठी काहीही करत नाही असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.