मुंबई । महाराष्ट्र बिलीयर्डस आणि स्नुकर असोसिएशन आयोजित ऑट्टर्स क्लब मुंबई स्नुकर लीग स्पर्धेत राहुल सचदेवने आणखी एक शतकी ब्रेक नोंदवत खार जिमखाना जीएसटी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. राहुलच्या या ब्रेकमुळे खार जिमखान्याने अंधेरी रिक्रेएशन क्लबच्या एआरसी चिता संघावर 3-1 असा विजय मिळवला. संघासाठी महत्वाच्या ठरलेल्या लढतीत राहुलने शतकी ब्रेक करत प्रतिस्पर्धी संघाच्या ओम सावंतवर 126- 50 असा सहज विजय मिळवला.