नवी दिल्ली । सचिन तेडूलकर क्रिकेट खेळत असतांना त्याला एकदिवसीय करिअरच्या 70 व्या सामना खेळतांना सचिनला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. 24 वर्षापुर्वी 27 मार्च 1994 ला भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन याने एक निर्णय घेतला होता.तो म्हणजे सचिन तेडूलकर प्रथम भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून मैदानावर खेळण्यास उतरविले आणि त्याने या संधीचेे सोने केले आणि जगाने मास्टर बाल्टरचा किताब दिला. 1994 ला भारत व इंग्लंड सामना सुरू असतांना भारतीय संघाचा नियमित सलामीवीर नवज्योत सिंह सिध्दूला दुखापत झाली होती. त्यावेळी भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनचा सचिनला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीवीर म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला.हीच इच्छा सचिनचीही होती.
त्यासाठी त्यांनी कर्णधार अजहरुद्दीन आणि व्यवस्थापक अजित वाडेकर यांच्याकडे मागणीही केली होती. या सामन्यात सचिनने 49 चेंडूत 82 धावांची आक्रमक खेळी केली. त्यामध्ये 15 चौकार व 2 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. 143 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने हा सामना 7 गडी राखून जिंकला होता. सचिनला या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला होता व अशारितीने अझरचा रणनिती यशस्वी ठरली होती. सलामीला येऊन सचिनने 344 सामन्यात 48.29 च्या सरासरीने सर्वाधिक 15,310 धावा केल्या. मधल्या फळीत फलंदाजीस येऊन सचिनने 119 सामन्यात 33 च्या सरासरीने 3,116 धावा केल्या. सचिनने एकदिवसीय कारकिर्दीत एकूण 49 पैकी 45 शतके सलामीला येऊन झळकावली आहेत.
एकदिवसीयमधील पहिले शतक सचिनने 79 व्या सामन्यात झळकावले. ते ही सलामीला येऊन. एका मुलाखतीत कर्णधार अझहरने म्हटले होते की, पहिल्यापासूनच माझ्या डोक्यात घोळत होते की, सचिनकडून डावाची सुरूवात करावी. पाचव्या किंवा सहाव्या नंबरवरती फलंदाजी करताना त्याला केवळ 5 ते 6 षटकेच फलंदाजी करण्यास मिळते. त्यामुळेच त्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी त्याला सलामीला पाठविण्यात आले.