सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ

0

पुणे – नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात औरंगाबादहून अटक केलेल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गौरी लंकेश आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या चौकशीसाठी सीबीआयने पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती.

शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांची सीबीआयला एकत्रित चौकशी करायची आहे. यासाठी सीबीआयकडून दोघांच्या पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार सचिन अंदुरे याची सीबीआय कोठडी ३० ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. तर कळसकरची पोलीस कोठडी २८ ऑगस्टला संपत आहे. त्यानंतर दाभोलकरांच्या हत्येच्या चौकशीसाठी कळसकरला सीबीआय अटक करणार आहे.

सीबीआयच्या या चौकशी दरम्यान दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसंबंधी अनेक नवे खुलासा होण्याची शक्यता आहे. या चौकशीतून या हत्याकांडामागील खरे सुत्रधार कोण आहेत. याचा खुलासा होऊ शकतो.