सचिन तेंडुलकरने दिले क्रिकेटचे धडे

0

‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अ‍ॅकॅडमी’ची स्थापना

पुणे : देशातील गुणवंत खेळाडूंना क्रिकेटसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अ‍ॅकॅडमीची स्थापना करण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी स्थापन केलेल्या या अकॅडमी अंतर्गत गुरुवारी बिशप्स हायस्कूलच्या मैदानावर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या अकॅडमीमध्ये शिकणार्‍या खेळाडूंनी सचिन तेंडुलकर आणि मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. यावेळी सचिनसोबत विनोद कांबळीदेखील उपस्थित होता. सध्याचे क्रिकेटचे स्वरूप जरी बदलले असले तरी क्रिकेटचे मूळ फाउंडेशन कधीच बदलणार नाही. चांगले क्रिकेटपटूच नव्हे, तर चांगले नागरिकही घडवणे हे ध्येय असल्याची प्रतिक्रिया तेंडुलकरने दिली.

तेंडुलकरने 29 वर्षापूर्वी 15 नोव्हेंबर 1989 रोजी कराचीच्या नॅशनल क्रिकेट मैदानावर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 29 वर्षे निघून गेली. मात्र, हृदयात आजही क्रिकेट कायम असल्याचे सचिन यावेळी म्हणाला.