मुंबई: सचिन तेंडूलकर यांच्या सारा तेंदुलकर, अर्जुन तेंडूलकर यांची ट्वीटरवर अकाऊंट असून ये बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे तेंडुलकरची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यामुळेच तेंडुलकरनं ट्विटर इंडियाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. बुधवारी केलेली पोस्ट ही ट्विटर इंडियाचे टेंशन वाढवणारी होती. त्यानं थेट ट्विटर इंडियाला अॅक्शन घेण्याची विनंती या पोस्टमधून केली.
सारा, अर्जुन यांच्या अकाऊंटवरून विविध राजकीय पोस्टही केल्या गेल्या आणि त्याच्याशी माझ्या कुटुंबातील कोणाचाही काडीमात्र संबंध नाही, असं तेंडुलकरनं स्पष्ट केलं. अर्जुन आणि सारा यांचं ट्विटरवर अकाऊंट नसल्याचं सांगत त्यानं ट्विटर इंडियाकडे फेक अकाऊंट बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यानं पोस्ट केली की,”मला हे स्पष्ट करायचे आहे की, माझा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांचे ट्विटरवर अकाऊंट नाही. अर्जुनच्या नावानं जे अकाऊंट आहे, ते बनावट आहे आणि त्याच्यावरून जाणीवपुर्वक वाद निर्माण होईल, असं ट्विट केलं गेलं. ट्विटर इंडियाला माझी विनंती आहे, की त्यांनी यावर कारवाई करावी.”