चांदसर: ठाण्यातील संत ज्ञानेश्वर प्रतिष्ठानचा यंदाचा पुरस्कार चांदसर येथील लोकनियुक्त सरपंच सचिन पवार यांना नुकताच जाहीर करण्यात आला. सचिन पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात जनजागृती करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच गावात वेळोवेळी धूर फवारणी, सॅनिटायझर वाटप करण्यात आले.या कार्याची दखल घेत संस्थेतर्फे सचिन पवार यांना ‘कोरोना योद्धा’ सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.
लॉकडाऊन संपल्यानंतर चांदसर येथील सरपंच सचिन पवार यांचा एका कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष अनिल चौधरी यांनी सांगितले.
ठाण्यातील संत ज्ञानेश्वर प्रतिष्ठान एक सेवाभावी संस्था असून संस्थेची स्थापना भरत चौधरी यांनी २०१४ साली केली.सध्या संस्थेचे अध्यक्ष भुषण पाटील असून, उपाध्यक्ष अनिल चौधरी, चांदसर येथील रहिवासी हल्ली मुक्काम ठाणे हे आहेत. आतापर्यंत संस्थेतर्फे गरजू महिलांना मदत, बचत गटांना प्रोत्साहन तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे.
आतापर्यंत 100 लोकांचा सत्कार करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा रोख रक्कम व पदक प्रदान करण्यात येते.