जयपुर- राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला.सचिवालयात जाऊन त्यांनी पदभार घेतला. मंत्रिमंडळ खातेवाटपात सचिन पायलट यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, ग्राम विकास, पंचायत राज, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
स्वच्छ व पारदर्शक कामगिरीचे आश्वासन त्यांनी पदभार स्वीकारतांना दिले आहे. त्यांच्याकडे राजस्थान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी आहे. जनतेची कामे करण्यासोबतच ते पक्ष वाढीला देखील महत्त्व देणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला त्यांनी सुरुवात केली आहे.