सचिन फुलवारी यांची गुरव समाज नवयुवक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

0

चाळीसगाव- येथील गुरव समाज नवयुवक मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन फुलवारी यांची नियुक्ती झाली असून ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कै. पप्पू गुंजाळ यांचे कट्टर समर्थक ओळखले जातात. गुरव समाज नवयुवक मंडळ या संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत समाजातील जमलेल्या सर्व सभासदांनी एकमताने फुलवारी यांची निवड करण्यात आली आहे अतिशय होतकरू, मितभाषी, कुशल संघटक असलेले सचिन फुलवारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सचिन फुलवारी हे गुरव समाजाच्या सामाजिक शैक्षणिक तसेच अनेक कार्यक्रमातून सतत कार्यरत राहत असल्याने समाजाला त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात चांगल्या परीने उपयोग होईल अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. मिटींगमध्ये मावळते अध्यक्ष रविंद्र गुरव (छोटूमास्टर),रामदास गुरव,वाल्मिक(शेठ)फुलवारी,गणेश गुरव, कृषभ गुरव,नितीन चव्हाण,सुभाष गुरव,गोपी गुरव,अरूण गुरव, सुनील गुरव,अरूण मोरे,अरुणा गुरव, संजय गुरव,संतोष गुरव, धोंडु गुरव, हिरामण गुरव,हर्षल गुरव, राहुल गुरव, मयूर गुरव, दिपक गुरव, ज्ञानेश्वर गुरव,शंकर गुरव आदी सर्व गुरव समाज बांधव उपस्थित होते. पप्पूदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान संभाजी सेना चाळीसगाव ,सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सचिन गुरव यांचे अभिनंदन केले आहे.