सचिवांनी दबावापोटी व्यापार्‍यांचे परवाने रद्द केले

0

शहादा । कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तोंडावर असल्याने राजकीय खेळी करीत संघटनेने शेतकरी आणि व्यापार्‍यांमध्ये फुट पाडलेचे काम करण्यात आले आहे. व्यापार्‍यांचे परवाने रद्द करण्याचा अधिकार सचिवांना नसतांना आलेल्या जमावाच्या आणि राजकीय दबावापोटी त्यांनी परवाना रद्द करण्याच्या कागदपत्रावर सह्या केल्या आहेत.तो अधिकार फक्त संचालक मंडळालाच आहे. धान्य खरेदी बंद झाल्याने शेतकर्‍यांचे आणि व्यापार्‍यांचे नुकसान होत असल्याचे पिपल्स बँकेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष प्रकाश जैन यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.रावेळी त्रांच्रासह इतर व्रापारी बांधव उपस्थित होते.

आर्थिक व्यवहार ठप्प
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार हमीभावा पेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणार्‍यां व्यापार्‍यांचे परवाने रद्दची मागणी केली होती. प्रशासनाने आठ व्यापार्‍यांचे परवाने रद्द केले असून त्या पार्श्‍वभूमीवर व्यापारी महा असोसिएशनतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.याप्रसंगी माहिती देतांना ते बोलत होते. यावेळी व्यापारी असोसिएशनचे गोपाळ शर्मा,कैलास अग्रवाल(शिरपूर),राहुल कवाड(दोंडाईचा), जय अग्रवाल(चोपडा),रमेशचंद छाजेड(अमळनेर),राजेंद्र जैन(नंदुरबार),प्रकाश कलाल(तळोदा),अशोक संचेती(खेडदिगर),गोपाळ मराठे(म्हसावद),अमित लखोटे(शिंदखेडा) आदी उपस्थित होते. स्व.अण्णासाहेब पाटील अस्तित्वात असतांना असा प्रकार कधीच घडला नाही ते गेल्यानंतर विचित्र प्रकार घडत आहेत. ही कारवाई लहान व्यापार्‍यांवर केली आहे. हमाल घरी बसले आहेत. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे शेतकरी,व्यापारी आणि बाजार समितीचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.