सज्जन कुमारचे कोर्टासमोर आत्मसमर्पण

0

नवी दिल्ली : १९८४ साली दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आलेली आहे. सज्जन कुमार यांना ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने शरण येण्याचे आदेश दिले होते. अखेर त्यांनी आज कोर्टासमोर स्वत:ला आत्मसमर्पित केले.

दिल्ली उच्च न्यायालायने १७ डिसेंबरला सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, त्यावेळी ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्याची मुदत दिली होती. सज्जन कुमार यांनी मुदत महिन्याभरासाठी वाढवून देण्याची मागणी केली. पण ती मागणी न्यायायलाने फेटाळली.