नवी दिल्ली- दिल्लीतील एका न्यायालयाने कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांच्या विरोधात १९८४ च्या शीख विरोधी दंगलप्रकरणी आणखी घेण्यात आलेली एक सुनावणी पुढे ढकलली आहे. २२ जानेवारीपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. १९८४ मधील शीख विरोधी दंगल प्रकरणी हिंसाचार भडकविण्याचे आरोप सज्जन कुमार यांच्यावर आहे.
१९८४ मध्ये सुलतानपूरीमध्ये १६ जणांची हत्या करण्यात आली होती. यापूर्वी सज्जन कुमार यांना ५ जणांच्या हत्येच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सुनावणीसाठी खुद्द सज्जन कुमार कोर्टात हजर झाले होते.