सज्जन वृत्तीसाठी चांगली पुस्तके वाचावीत : सबनीस

0

पिंपरी-चिंचवड : सद्विचारांनी भरलेले पुस्तक वाचले, तर माणसाच्या अंतःकरणातील सज्जन वृत्ती वाढते, म्हणून सतत चांगली पुस्तके वाचली पाहिजेत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. प्रा. दिगंबर ढोकले यांच्या ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग’ या पुस्तकाच्या प्रकाशनवेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव होते. यावेळी म.सा.प.चे पुण्याचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल राज मुछाल, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, माजी नगरसेवक वसंत नाना लोंढे, नितीन लांडगे, सागर गवळी, अनुराधा गोफणे, काषाय प्रकाशनाचे प्रकाशक कवी चंद्रकांत वानखेडे तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथदिंडीव्दारे पुस्तक व्यासपीठावर
म.सा.प. भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन म.सा.प. भोसरीचे पुरुषोत्तम सदाफुले, मुकुंद आवटे, अरुण इंगळे. डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. अनु गायकवाड, प्रा. शंकर देवरे, बाळासाहेब ढमे, जयवंत भोसले, डॉ. शंकर गायकवाड आदींनी केले. भजनसम्राज्ञी मीरा काटमोरे यांच्या अभंगगावणीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वारकरी ग्रंथदिंडीद्वारे पुस्तक व्यासपीठावर आणून त्यांचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी भरत दौंडकर यांनी केले. मुकुंद आवटे यांनी आभार मानले.