सट्टापेढीवर धाड; 13 सटोड्यांना अटक

0

जळगाव। जुना खेडी रस्त्यावरील मोकळ्या जागेत असलेल्या सट्टापेढीवर प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक यांच्या पथकाने शनिवारी दुपारी धाड टाकली. यात 48 हजार रुपयांच्या रोकडसह 1 दुचाकी व 7 मोबाईल जप्त केले आहे. दरम्यान, 13 सटोड्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आली. दरम्यान, सटोड्यांकडून पोलिसांनी एकूण 72 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सलग एक दिवसाआड प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक धनंजय पाटील हे करीत असलेल्या धडकेबाज कारवाईमुळे सटोड्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन दिवसाआधीही धनंजय पाटील यांनी नेरीनाका परिसरातील झिपरूअण्णानगरात खंडू वामण राणे यांच्या सट्टापेढीवर कारवाई करत 25 जणांना अटक करून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. विशेष म्हणजे जुना खेडी रस्त्यावरील सट्टापेढील आज शनिवारी दुपारी धाड टाकण्यात आली असून ही सट्टापेढी खंडू राणे याचीच असल्योच समोर आले आहे.

जुना खेडी रस्त्यारील सट्टापेढीवर धाड
जुना खेडी रस्त्यावरील मोकळ्या जागेत सट्टापेढी सुरू होती. यातच ही सट्टापेढीही खंडू वामन राणे याच्या मालकीची असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर धनंजय पाटील यांनी पोलिस अधीक्षक यांच्या क्युआरटी पथकाच्या मदतीने धाड टाकली. पोलिसांनी धाड टाकताच पळपळ सुरू झाली. यानंतर पोलिसांनी सर्वांना घराव घालत पकडले. मात्र, यात सट्टापेढीमालक खंडू राणे हा गर्दीचा फायदा घेत पळुन गेला. मात्र, धाडीत 48 हजारांची रोकड, बारा हजार रुपये किंमतीची एमएच.19.एएच.4012 ही एक दुचाकी, सात मोबाईल, सट्ट्याचे आकडे लिहिण्याच्या पावत्या, दोन ते तीन ट्रे असा मुद्देमाल जप्त केला. तसेच 13 सटोड्यांना शनिपेठ पोलिस ठाण्यात आणल्यानंतर डीवायएसपी पाटील यांनी त्यांची माहिती करून घेतली. सटोड्यांकडून एकुण 72 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ डाली आहे. प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्यासह पथकातील प्रशांत कोकाटे, दिपक सोनवणेस, राहुल धोटे, धनंजय येवले, नंदकिशोर ढापणे, तेजस मराठे, अनिल कांबळे, अभिमान पाटील, रिजवान शेख, अनिल बडगुज यांनी ही कारवाई केली.

यांच्यावर झाली कारवाई
दोन दिवसा अगोदर झिपरूअण्णा नगरात उपप्रशिक्षणार्थी उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी खंडू राणे यांच्या सट्टापेढी धाव टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. तर आज शनिवारी खेडी रस्त्यावर असलेली सट्टापेढीची खंडु राणे याचीच असल्याचे समोर आले आहे. यातच शनिवारी सट्टापेढीत सट्टा खेळतांना सिध्दार्थ शामराव अहिरे, भगवान माणिक पाटील, उत्तम राम सुरवसे, राजेंद्र दशरत पाटील, आनंदा भिका सोनवणे, अशोक भिमा सपकाळे, सदाशिव रामसिंग महाजन, योगेश चावदस सपकाळे, अमोल नारायण खडके, माधव मारूती धुमाळ, कैलास शंकर माळी, अर्जुन धनसिंग पाटील, भादु देवराम पाटील हे सापडले आहेत. यांच्याविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अशी कारवाई सुरू राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.