सडगाव येथील वृध्द दाम्पत्याचे जिल्हाधिकारी कार्यासमोर उपोषण

0

धुळे । वडिलोपार्जित शेतीच्या वादातून भाऊबंदकीचा त्रास गेल्या 20 वर्षांपासून होत असून प्रशासनाने या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी करीत सडगाव येथील वृध्द दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु केले.

असा आहे जाचाचा घटनाक्रम
वास्तविक, या शेतजमिन व घरांची वाटणी बुधा गबा मासुळे हे जीवंत असतांनाच त्यांनी करून दिली होती. तर काही जमिन स्वतःच्या नावे ठेवली होती. 12 ऑगस्ट 1996 रोजी बुधा मासुळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावे असलेली शेती व घराची किंमत 50 हजार ठरवून वडिलांच्या उत्तरकार्याचा खर्च प्रभाकर पाटील यांनी करावा व त्या बदल्यात घर आणि शेती घ्यावे, असे त्यावेळी ठरले होते. मात्र प्रत्यक्षात घर व जमिन नावावर करतांना केवळ खरेदीखत लिहून घेण्यात आले. कालांतराने जमिनीची किंमत वाढल्याने भावांनी जमिनीत हिस्सा मागितला. त्यावरून त्रास देणे सुरु केले आहे. या त्रासाला कंटाळून प्रभाकर पाटील हे 1998 ते 2005 पावेतो कुटुंबासह बाहेरगावी निघून गेले होते. तर 2003 मध्ये आईचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराच्यावेळी भावांनी मारहाण केल्याने प्रभाकर पाटील यांचे मानिसक संतूलन बिघडले होते. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने आता प्रशासनानेच यात हस्तक्षेप करावा व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करीत प्रभाकर पाटीलसह त्यांच्या पत्नी देवकाबाई पाटील (मासुळे) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

20 वर्षांपासून त्रास…
या संदर्भात एक पत्रक प्रसिध्दीस देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, सडगाव येथील वडिलोपार्जित शेती आपल्या ताब्यात असतांना भाऊ जनार्दन बुधा पाटील, वहिणी भुरीबाई जनार्दन पाटील, पुतण्या रोहिदास जनार्दन पाटील (तिघे रा.सडगाव), भावराव बुधा पाटील, सुंदबाई भावराव पाटील, मोतीलाल भावराव पाटील, संगिता मोतीलाल पाटील, हिरालाल भावराव पाटील बापू भावराव पाटील, मच्छिंद्र भावराव पाटील (सर्व रा. सडगावहें कळवाडी) व आसाराम भावराव पाटील (रा.सडगाव) हे गेल्या 20 वर्षांपासून त्रास देत आहेत.