सणसवाडीत सात लाखांची चोरी

0

सणसवाडी । सणसवाडी ता. शिरूर येथील भर चौकात हायवेलगत असलेल्या शिवराज मोबाईल शॉपीची सहा कुलुपे व शटरलॉक तोडून चोरट्यांनी सात लाख रुपये किमतीचे मोबाईल सोमवारी रात्री लुटून नेल्याची घटना घडली आहे.याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रशांत माने, ए.ए. देशमुख, तेजस रासकर, बी.बी.थिकोले आदींसह पोलिस पथकाने घटनास्थळी पंचनामा केला आहे. गेल्या पंधरा दिवसातील मोठ्या चोरीची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सणसवाडी चौकातील हरगुडे कॉम्प्लेक्समध्ये शिवराज मोबाईल शॉपी हे संदीप संजय दरेकर यांचे मालकीचे दुकान गेली सहा वर्षापासून चांगल्या प्रकारे सुरु आहे . पंधरा दिवसापूर्वीच दरेकर यांनी दुकानात नवीन फर्निचरचे काम आणि रंगरंगोटीचे काम करून घेतले होते .काम करून घेतल्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता त्यांनी नुकताच दुकानात भरगच्च मालही भरला होता.

चोरट्यांनी सोमवारी शटरचे दोन लॉक व बाहेरीलजाळीचे चार लॉकच्या लोखंडी पट्या कटरने तोडून टाकलेला दरोडा सकाळी निदर्शनास आला. रात्री ४ वाजता शेजारील राज मोबाईल शॉपीचे मालकाने दुकानाकडे चक्कर मारली होती मात्र त्याने शेजारी काही लक्ष दिले नव्हते. राजचा सीसीटीव्ही कँमेरा चालू होता मात्र शिवराज मोबईल शॉपीचा क्यामेरा बंद असल्याने जाड पट्ट्यांचे जाळीचे अंगल वाकवून लॉकपट्या तोडल्या माहितीगाराचे काम असल्याची चर्चा आहे.तशा लहान मोठ्या चोर्‍या रोजच होतात मात्र कुणी गांभीर्याने घेत नाही. तक्रार देत नाहीत. पण हा एवढे लॉक तोडून भर चौकातील दुकान फोडून दरोडा घालून चोरांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. त्याच बरोबर सणसवाडी परिसरात सात्यत्याने वाढत चाललेल्या चोरीची प्रकरण पोलिसांना अवाहन झाले आहे. तर या व सर्व चोर्‍याचा तपास व्हावा तसेच रात्रीच्या गस्ती या परिसरात वाढवाव्या अशी नागरिकांची व व्यवसायिकांची होत आहे.