सत्ताधार्‍यांनो, पाणी बचत फक्त नागरिकांनी करायची का?

0

आकुर्डी : येथील जय गणेश व्हिजन कॉम्प्लेक्स शेजारी मोकळ्या मैदानामधून जाणारी एमआयडीसीची जलवाहिनी आज दुपारी दोनच्या सुमारास फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. या जलवाहिनीमधून 30 ते 35 फूट उंच कारंजे उडत असल्याने या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमा झाली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला या घटनेची माहिती दिली असून दुरुस्तीचे काम हाती घेईपर्यंत पाणी वाया जाणार आहे. सात ते आठ वर्षापूर्वी देखील ही जलवाहिनी फुटली होती. पाण्याचे कारंजे पाहण्यासाठी बघ्यांची मात्र मैदानावर चांगलीच गर्दी जमली आहे.