मुंबई: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईत किसान सभेने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. लाखोंच्या संख्येने शेतकरी सहभागी होत आहे. याला राजकीय पक्षांनी देखील पाठींबा दिलेला आहे. राज्यातील २१ जिल्ह्यातील शेतकरी या मोर्च्यात सहभागी झाले आहे. महाविकास आघाडीतील पक्षाने या मोर्चाला पाठींबा देत सहभागी झाले आहे. सर्व नेत्यांचे यावेळी भाषण झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे यावेळी भाषण झाले. त्यांनी कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची पर्वा नाही, असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला. सरकारची भूमिका नाकर्तेपणाची आहे. कृषी कायद्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे. कायदा आणताना सविस्तर चर्चा केली पाहिजे होती. मात्र सरकार हुकुमशाही प्रवृत्तीची आहे अशी टीकाही पवारांनी केली.
संसदेत कायदा मंजूर करतांना बोलू दिले नाही. ६० दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत, मात्र सरकार याची दखल घेत नसल्याचे शरद पवारांनी म्हटले.