सत्ता दिल्यास नंदुरबार पालिकेचे पालकत्व स्वीकारेल

0

तळोदा/नंदुरबार । पालिका भाजपच्या ताब्यात द्या, मी तिचे पालकत्व स्वीकारतो. असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नंदुरबारच्या जाहीर सभेत दिले. तळोदा, नंदुरबारात त्यांच्या जाहीर सभा झाल्या. 50 कोटी रूपये खर्चुन तळोद्याला आधुनिक शहर बनविणार असल्याचेही त्यांनी या सभांमध्ये सांगितले. कॉग्रेसवर टिकास्त्र सोडत, विकासासाठी भाजपला साथ द्या असे आवाहन त्यांनी या सभांमधून केले.

नंदुरबारात महिला बचतगटांसाठी मॉल
नंदुरबारला बेघरमुक्त शहर करायचे आहे. महिला बचत गटांसाठी नंदुरबारात मॉल उभारणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत दिली. एमआयडीसीबाबत प्रयत्न करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार रवीेेद्र चौधरी, खा. हिना गावित, पालकमंत्री जयकुमार रावल, आ. विजयकुमार गावित, भाजप ओबिसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी आदींचीही भाषणे झाली.

बेघरांना घरे देणार
तळोदा पालिकेत काँग्रेसची सत्ता असतांना सुद्धा आम्ही तळोदा पालिकेला 11 कोटी रु चे अनुदान दिले आहे. त्याच्या हिशोब येणार्‍या काळात आम्ही काँग्रेस कडून घेऊच जनतेच्या तक्रारी आल्यातर पालिकेत भाजप सत्तेत असली तरी पालिका बरखास्त करू असा इशारा त्यांनी दिला. भाजपला निवडून आणले तर लगेच विकास आराखडा तयार करू व त्यास नगरविकास खात्याकडून मंजुरी देऊन बेघरांना मागाल तेवढी घरे देऊ, असेही त्यांनी सांगितले. खा. डॉ हिना गावित, पालकमंत्री जयकुमार रावल आमदार उदेसिंग पाडवी शहादा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील नागेश पाडवी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय परदेशी, वंदना मगरे व भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.

नाराज गटाकडून सत्कार
भाजपच्या निष्ठवंतांना उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज असलेले गटातील भाजपचे प्रदेश सदस्य डॉ शशिकांत वाणी जिल्हा सरचिटणीस प्रा विलास डामरे तालुकाध्यक्ष श्याम राजपूत उपजिल्हाध्यक्ष रुपसिंग पाडवी हे मुख्यमंत्र्यांच्या सभेत अनुपस्थित होते. मात्र त्यांनी मुख्यमंत्री सभास्थळी येत असतांना रस्त्यात मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवली असता मुख्यमंत्री स्वतः गाडीतून उतरले व त्यांनी डॉ वाणी व नाराज गटाचा सत्कार स्वीकारला.