सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेमुळे गाव एकत्र येते

0

शिंदखेडा । पाणी फॉउंडेशनचे मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी शनिवारी रात्री साडे आठ वाजता भडने गावात साइटवर जाऊन श्रमदान केले. त्याआधी त्यांचे पाणी फॉउंडेशनच्या पद्धतीनुसार तीनदा शाब्दिक फुले-फुले-फुले म्हणत स्वागत केले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भड़ने गावात येवून श्रमदान करण्याचे मला सौभाग्य लाभले, येथील लोकांची श्रमदानासाठीची जिद्द ,जोश ,तळमळ पाहुन मी भरावलो.ही स्पर्धा आहे, बक्षीस मिळणे हा गौण भाग आहे. या स्पर्धेमुळे पूर्ण गांव एकत्र येते ,हे महत्वाचे आहे. असे याप्रसंगी श्री भटकळ यांनी सांगितले.

भटकळ यांचे भडने गावात श्रमदान
त्यांच्यासोबत भारतीय जैन संघटनेचे खानदेश विभाग सचिव प्रा.चंद्रकांत डागा, शिवसेनेचे तालूका प्रमुख विश्‍वनाथ पाटिल, सतिष माली, देवीसिंग गिरासे, भास्कर पाटिल, मोहन गोसावी, दत्तु माळी, गिरीश देसले, ग्रामसेवक राहुल मोरे, पाणी फॉउंडेशन चे विभाग समन्वयक गणेश मांडोरे, धुळे तालुका समन्वयक राहुल पवार, घोडेस्वार,शिंदखेड़ा तालुका समन्वयक ज्ञानेश मगर, संदीप कोळी व ग्रामस्थ यांनी श्रमदान केले. श्री भटकळ पुढे म्हणाले, पाणीदार गांव होण्यासाठी श्रमदानात सातत्य असले पाहिजे. या वर्षापासून या गवाने एक मोठा प्रवास सुरु केला आहे. नाही तर आहे त्यापेक्षा भीषण परिस्थिति निर्माण झाली असती. आपण सर्वांनी निसर्गाचा र्‍हास केला. याचे प्रयाश्‍चित म्हणून त्याची सुरवात भड़ने गावाने केली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जैन संघटेनेचे ही त्यांनी कौतुक केल्यानंतर सार्वे गावात श्रमदान सुरु असल्याने तेथील शरद पाटील, शरद भामरे, विस्तारंअधिकारी भीमराव गरुड़ आदिंशी चर्चा केली.