मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानपरिषदेत आवाहन
नागपूर- विधानपरिषद सभागृह हे वैयक्तिक भांडणाचे सदन नाही त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूच्या सदस्यांनी योग्य संयम बाळगून वक्तव्य करावीत असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित करतगेल्या काही दिवसात विधानपरिषदेतले वातावरण गढूळ झाल्याच्या पा मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली.
हे देखील वाचा
यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यांशी तटकरे आणि रणपिसे यांनी मांडलेल्या बहुतांश मुद्द्यांशी सहमत असल्याचे सांगत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एकमेकांचे शत्रू नाही त्यामुळे धोरणांवर टीका करताना वैयक्तिक, असंसदीय वक्तव्य या सभागृहात होणे योग्य नाही असे ते म्हणाले. या सभागृहाचा सन्मान राहिला पाहिजे तसंच चांगले दाखले या सभागृहात तयार झाले पाहिजेत त्यादृष्टीने दोन्ही बाजूनी योग्य संयम बाळगला पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.