सी.ई.ओ.जगताप यांच्या निषेधार्थ
खडकी : रेंजहिल्स व्यायामशाळा कारवाई बाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत असल्या प्रकरणी सी.ई.ओ.अमोल जगताप यांच्या निषेधार्थ महिला सदस्या वैशाली पहलवान यांनी प्रवेशद्वारातच ठिय्या मांडून धरणे आंदोलन केले. रेंजहिल्स व्यायामशाळा कारवाई प्रकरणी सी.ई.ओ.अमोल जगताप यांची भेट घेण्याकरीता सदस्या वैशाली पहलवान यांनी मोबाईल वरुन त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र जगताप यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सदस्या पहलवान त्यांचे पति कैलास पहलवान तसेच किरण पहलवान व कार्यकर्त्यांनी जगताप यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्या करीता गोंधळ घालीत भेटण्याचा प्रयत्न केला मात्र जगताप यांना भेटु दिले नाही. सी.ई.ओ.जगताप घरी नसल्याचे यावेळी सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आले.
ठिय्या आंदोलन
जगताप यांच्या या असहकार्याच्या भुमिके निषेधार्थ सदस्या पहलवान व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कॅन्टोमेंट प्रवेशद्वारातच ठिय्या आंदोलन केले. हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत असताना खडकी पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिस निरिक्षक (गुन्हे) अजित लकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.शिंदे आले. त्यांनी सदस्या पहलवान यांना कॅन्टोमेंट प्रवेशद्वारावर अडवून आंदोलन करु नका अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल अशी भुमिका घेतली. तर सीईओंना भेटल्या शिवाय आम्ही हटणार नाही अशी परखड भुमिका सदस्या पहलवान यांनी या वेळी घेतली. अखेर पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी केली.
त्यानंतर सीईओ जगताप यांनी सदस्या पहवान यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सदस्य मनीष आनंद व सदस्या पुजा आनंद उपस्थित होते. सीईओ जगताप यांनी यावेळी रेंजहिल्स व्यायामशाळा प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने तेथील निर्णया नंतरच कारवाईची भुमिका घेईल. न्यायालयीन निर्णयापर्यंत सहकार्याची भुमिका घ्यावी, असे सांगितले. जगताप यांनी भेटुन चर्चा केल्याने व या प्रकरणी स्पष्टीकरण केल्याने सदस्या पहलवान यांनी आपले आंदोलन मागे घेतले.