सांगली : काही जण स्वतःचे नेतृत्व अबाधित ठेवण्यासाठी कर्जमाफीला विरोध करून कांगावा करत आहेत, असा आरोप करीत राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. कर्जमाफी दिल्यानंतर इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी राज्यमंत्री खोत बोलत होते. खोत यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी येऊन आदरांजली वाहिली.
भाजप-शिवसेना आणि सर्व घटक पक्षांचे सरकार चांगली कामगिरी करीत असून आगामी काळात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ.
सदाभाऊ खोत,
कृषी राज्यमंत्री