बोपोडी येथे प्रथमच ओपन जीमची सुविधा
खडकी : सध्याच्या दगदगीच्या आणि प्रदुषणयुक्त काळात आरोग्याची निगा राखणे काळाची गरज बनली आहे. सदृढ आरोग्य राखण्याकरीता नियमीत व्यायाम आवश्यक आहे. महापालिकाव स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरीकांकरीता उपलब्ध करुन दिलेली ओपन जीमची सुविधा ही कौतुकास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार खासदार संजय काकडे यांनी काढले. पुणे महापालिकेच्यावतीने बोपोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ओपन जीमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच खासदार काकडे यांच्या हस्ते पार पडला. त्या प्रसंगी काकडे बोलत होते.
यावेळी नगरसेविका सुनिता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, माजी महापौर सुरेश शेवाळे, अॅड. सुनील जपे, आनंद जुनावने, अप्पा वाडेकर, अविराज हुगे, सचिन घोरपडे, अंकल रावत, सचिन अंकेलु आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परीसरात शारिरीक तंदुरुस्तीसाठी आवश्यक अशी आठ मशिन्स देण्यात आले आहेत. या व्यायाशिाळेचा सर्व थरातील नागरीक लाभ घेत आहेत. ज्येष्ठ नागरीक व महिला वर्गही या व्यायामशाळेचा लाभ घेत आहेत. या परीसरात महिलांकरीता व्यायामशाळा महीला वर्गाने खास आनंद व्यक्त केला आहे.