नवापूर। संत नामदेवांच्या विचारांचे स्मरण करून पालकांनी आपल्या मुलांना संस्कार द्यावेत. ज्ञानाची ज्योत जगात पसरविण्यासाठी नामदेवांनी किर्तनाचे माध्यम निवडून सदविचार लोकांपर्यत पोहचवून खर्या अर्थाने परमेश्वरप्राप्ती केली असे मत प्रा.ए.बी. महाजन यांनी संत नामदेव महाराज पूण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले. साईनाथ मंदिर प्रभाकर कॉलनी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष भानूदास चव्हाण, तालूकाध्यक्ष दत्तात्रय अहिराव, शंकर दर्जी, मणिलाल पवार, भिकाजी टिभे, सूरेश जगताप, माजी उपनगराध्यक्षा शैला टिभे ,महिला अध्यक्षा संगीता खैरनार ,विजय चव्हाण , म.का. सदस्य दिलीप चव्हाण , शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
संत शिरोमणी असा उल्लेख नामदेव महाराजांप्रती
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भानूदास चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की संत शिरोमणी असा उल्लेख नामदेव महाराज प्रती करण्यात येतो ती समाजासाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी शंकर दर्जी यांनी ही मनोगत व्यक्त केले . दरम्यान दहावी बारावीत विशेष नैपुण्य घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सचीव प्रकाश खैरनार यांनी केले. तर सूत्रसंचलन कविता खैरनार व आभार महेंद्र चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष राजेंद्र भामरे ,संदिप चव्हाण ,यूवाध्यक्ष प्रविण ब्रम्हे, दिनेश खैरनार ,किशोर बोरसे, राज चव्हाण, दिपक पवार, किशोर पवार, संजय पवार ,शारदा चव्हाण यांनी परिश्रम घेतले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.