सनातन संघटना बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे–केसरकर

0

 मुंबई: डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सुरु असणाऱ्या सनातन साधकांच्या अटक सत्रामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे, तर दुसरीकडे सरकार सनातन सारख्या कट्टर हिंदू संघटनांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आधीच केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचं राज्यचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

एखादी व्यक्ती अशा संघटनांशी संबंधित असल्याचे आढळले तर संघटनांनी स्वतःहून पुढे येऊन त्याचे खंडन केले पाहिजे. पण असे आढळून आलेले नाही. शेवटी सगळ्या वस्तुस्थिती लक्षात घेऊन केंद्र शासनाने हा निर्णय घ्यायचा असतो, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पूर्वीच केंद्र सरकारला देण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारने या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगितले होते. दरम्यान, केंद्राने सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता राज्य सरकारकडून करण्यात आली आहे, त्यामुळे राज्य शासनाकडे हा प्रस्ताव अडलेला आहे किंवा आम्ही अॅक्शन घ्यायला उत्सुक नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचं दीपक केसरकर म्हणाले.