सनातन संस्थेचे डॉ.जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम

0

जळगाव । सनातन संस्थेचे संस्थापक डॉ.जयंत आठवले यांना वैशाख कृष्ण सप्तमी 18 मे 2017 या दिवशी, 75 वर्षे पूर्ण होत आहे. या निम्मिताने समाज, राष्ट्र आणि धर्म यासाठी गुरु डॉ.जयंत आठवले यांनी केलेला त्याग आणि महानकार्याची समाजाला ओळख व्हावी, यासाठी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतभरामध्ये हिंदू राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अध्यात्म, साधना आदींसह हिंदूसंघटन, समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी समाजात कामे सुरु झाली. त्यांच्या अमृत महोत्सवा निम्मिताने जळगाव येथे शनिवार दि.27 मे रोजी दुपारी 4.30 वा. भव्य हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी सनातनचे संत नंदकुमार जाधव,वळसाळेकर महाराज,प्रशांत जुवेकर,राजश्री देशपांडे आदी उपस्थित होते.

275 ग्रंथांचे प्रकाशन
जळगाव, धुळे, नंदुरबार आणि बर्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे साधना आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता या विषयावर 33 व्याख्याने, 36 मंदिरांची स्वच्छता, 9 ठिकाणी धर्मजागृती सभा, तसेच शौर्यजागरण शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे. समाजामध्ये ग्रंथ, फ्लेक्स, प्रदर्शन यांच्या माध्यमातून हिंदू राष्ट्र जागृती पर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षय तुतीय्या ते गुरुपोर्णिमा याकाळात विविध कार्यक्रम घेण्यात आल्यावर सुरु देखील आहे. सनातनचे प्रमुख असलेले डॉ जयंत आठवले यांचे संकलित केलेल्या 275 हून अधिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

सहभागी होण्याचे आवाहन
साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक सनातन प्रभात या नियतकालिका सुरु करण्यात आल्या आहे. नालंदा, तक्षशिला या प्राचीन विश्‍वविद्यालयांसम अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापनेचा संकल्प करण्यात आला आहे. अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण भारतात हिंदू राष्ट्राविषयी जागर होण्यासाठी शहरातील हिंदूत्ववादी संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

27 मे रोजी एकता दिंडीचे आयोजन
1650 हून अधिक ठिकाणी आनंदी जीवनासाठी अध्यात्म, साधना आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता, तणावमुक्तीसाठी अध्यात्म, व्यक्तीमत्व विकासासाठी अध्यात्म, आदी विविध विषयांवर व्याख्याने घेण्यात आली आहे, 285 हून अधिक ठिकाणी हिंदू राष्ट्र-स्थापनेची आवश्यकता असलेल्या हिंदू राष्ट्र-जागृती सभा, 185 हून अधिक ठिकाणी युवकांना राष्ट्ररक्षणासाठी प्रेरित करणारी युवा शोर्य जागरण शिबिरे सुरू करण्यात आली आहे. 300 हून अधिक ठिकाणी सनातनचे प्रमुख डॉ.आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शने विविध परिसरात लावण्यात आली आहे. 275 हून अधिक मंदिर स्वच्छता आणि 70 हून अधिक राष्ट्रपुरुषांची स्मारके यांची स्वच्छता, 50 हून अधिक ठिकाणी अधिवक्ता शिबिर आणि माहिती अधिकार शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.