नवी दिल्ली-समाजवादी पक्षाने कॉंग्रेसप्रणीत महाआघाडीशी फारकत घेतली आहे. काल सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी महाआघाडीत सहभागी न होण्याचा निर्णय घेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी प्रस्तावित केलेल्या तिसऱ्या आघाडीला पाठिंबा दिला आहे. दरम्यान यावर कॉंग्रेस नेते राज बब्बर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या बोलण्यातून नाराजी दिसून येत आहे. नाराजी ही आपल्या लोकांवर असते, परकीय लोकांवर नाही असे सांगत त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करून नाराजी सोडविली जाईल, तसेच सोबत निवडणूक लढू असे सांगितले आहे.
जनतेची इच्छा आहे आम्ही एकत्र निवडणूक लढावी अशी आहे, त्यामुळे आम्ही एकत्र निवडणूक लढू असे राज बब्बर यांनी सांगितले.