इटाह: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर प्रदेशातील इटाह येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टी व बहुजन समाजवादी पार्टीवर टीकास्त्र सोडले. सपा, बसपाची दोस्ती सध्या लोकसभा निवडणूक सुरु असल्याने झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील ही दोस्ती झाली होती. मात्र निवडणूक झाल्यानंतर लगेचच ही दोस्ती तुटली. त्याचप्रमाणे आता देखील ही दोस्ती तुटणार आहे. दोस्ती तुटण्याची तारीख निश्चित आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
२३ मे रोजी लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्याच दिवसी यांची दोस्ती तुटेल असे मोदींनी सांगितले. खोटी दोस्ती आहे ती तुटणारच असे मोदींनी सांगितले.