जळगाव। अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावाचे आरोग्य दैवत बापूसाहेब उर्फ डॉ.सुधाकर गणपत नेमाडे हे गोरगरीब आणि सर्वांसाठी रात्र असो की दिवस आरोग्य सेवा देत आहेत. तसेच कधीही वेळेचे भान न ठेवता सर्वांना उत्तम अशी आरोग्यसेवा देणार्या डॉ.विजयाबाई सुधाकर नेमाडे हे दोघेही जण कधीही पैशांचा विचार न करता कळमसरे गावात सेवा देत आहेत. आज त्यांच्या सेवेला 45 वर्षे पूर्ण झालीत. ते सतत गावांना आरोग्य सेवा देत आहे. कोणताही आजार असो ते नेहमी रुग्णाला कमी खर्चात कसे काम होईल, असा सल्ला देतात. खरोखर बापू व ताई गावात डॉक्टर रुपात आले आणि कळमसरेच नव्हे तर आजुबाजुचे खेडे सुध्दा भाग्यशाली ठरले आहे. खेड्यावरचा रुग्ण कितीही रात्री आला तरी कधीही कंटाळा केला नाही. खान्देशचे आराध्य दैवत वणी निवासिनी सप्तश्रृंगी देवीच्या पदयात्री व भाविकांसाठी डॉ.नेमाडे दाम्पत्यांनी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करुन दिली आहे. रुग्णसेवेसोबतच मोफत औषध देत आहेत. डॉ.सुधाकर गणपत नेमाडे आणि डॉ.विजयाबाई सुधाकर नेमाडे यांनी कळमसरे आणि नांदेड फाटा धरणगाव रस्ता येथे यात्रेनिमित्त सेवा उपलब्ध केली आहे.