चिंबळीः जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आळंदी नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचार्यांचा गौरव समारंभ आळंदी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रांगणात शिवसेना आळंदी शहर व इंद्रायणी महिला विकास संस्था यांच्या माध्यमातून पार पडला.यावेळी महिलांना गुलाबपुष्प व साडी चोळी देऊन गौरविण्यात आले.
समारंभासाठी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे, शहरप्रमुख रोहिदास तापकीर, नगरसेवक रमेश गोगावले, शिवसेना गटनेते आदित्य घुंडरे, नगरसेविका प्रतिभाताई गोगावले, नगरसेविका व इंद्रायणी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सविताताई गावडे, शिवसेना शहर संघटक आनंदराव मुंगसे, विभागप्रमुख अमोल विरकर,प्रसाद दिंडाळ,सुरेश झोंबाडे, उपशहरप्रमुख संदिप पगडे, गणेश नेटके,संजय तापकीर, महिला आघाडीच्या शहर संघटक मंगलताई हुंडारे, विभाग संघटक संगिताताई फपाळ, युवासेनेचे आशिष गोगावले,ज्ञानेश्वर घुंडरे,सागर कारेकर,ओंकार आव्हाड हे उपस्थित होते.