शिरपूर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास केंद्र सरकारच्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर
मांडण्यासाठी 11 जुन रोजी शिरपूर येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सबका साथ सबका विकास या संमेलनाचे उदघाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे करणार आहेत. तर संमेलनाचे अध्यक्षस्थानी राज्याचे पर्यटन विकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल असतील.
स्वातंत्र्य सैनिक मंगल कार्यालयात आयोजन
प्रमुख पाहूणे म्हणून खासदार हिना गावित, भाजपा प्रदेश चिटणीस तथा जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी, भाजपा उत्तर महाराष्ट विभाग संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर असतील. संमेलन रविवार 11 जुन रोजी सकाळी 10 वाजता स्वातं़त्र्य सैनिक शंकरनाना मंगल कार्यालय शिरपूर येथे होणार असून संमेलनाचे आयोजन हिंदुस्तान पेर्टोलियम कॉर्पोरेशन लि. यांनी केले आहे. धुळे जिल्हयातील व शिरपूर तालुक्यातून भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चैधरी, जिल्हापदाधिकारी व मंडळ अध्यक्ष यांनी केले आहे.