सभापतींच्या हस्ते सेवानिवृत्तांचा केला सत्कार

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून सेवानिवृत्त होणार्‍या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एकूण 14 अधिकारी व कर्मचार्‍यांचा स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, विजय साबळे, कर्मचारी महासंघाचे सचिव चारुशिला जोशी, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले आदी उपस्थित होते. महापालिका सेवेतून निवृत्त झालेल्यांमध्ये मुख्याध्यापिका मंगल ननवरे, कार्यालयीन अधीक्षक सुरेखा कनकुरे, मुख्य लिपिक शुभदा पिटके, मुकादम घनशाम लुकर, मजूर नजीर खान यांचा समावेश आहे. तसेच सिस्टर इनचार्ज कविता शेळके, ए.एन.एम सुजाता गोरे, मुकादम शिवाजी शेळके, आरोग्य कर्मचारी सिंधु काळे, सुमन शिंदे, शोभा सौंदाणे, पमाबाई पोटे, समिंद्र नाणेकर, विजया पोंगडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.