धुळेे । कॉंग्रेसचे नेते तथा जि.प. सभापती मधुकर गर्दे यांच्या जयहिंद कॉलनीतील घरी जाऊन कुंटूबियांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची आणि घर जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली. याबाबत विनोद पांडूरंग गर्दे (30) रा.112, जयहिंद कॉलनी, देवपूर यांनी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. फिर्यांदीनुसार 6 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता जयहिंद कॉलनीतील विनोद गर्दे यांच्या घरी येऊन सोपान छगन पाटील रा.चितोड रोड,धुळे याने काही एक कारण नसतांना विनोद गर्दे यांना व त्यांच्या कुंटूंबियांना शिवीगाळ दमबाजी करुन ठार मारण्याची धमकी देत घर जाळून टाकण्याची धमकावले. याप्रकरणी देवपूर पोलिसांनी सोपान पाटील विरुध्द गुन्हादाखल केला आहे.
सोपान छगन पाटील यानेही देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद देत मधुकर गर्दे आणि तिघांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. सोपान छगन पाटील (35) रा.सडगाव ता.धुळे या नावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, 6 रोजी सायंकाळी 7 वाजता देवपूर भागातील जयहिंद कॉलनीत प्लॉट नं.112 येथे मधुकर गर्दे यांच्यासह तिघांनी फिर्यादी सोपान पाटील यास तु आमच्या विरोधात का राजकारण करतो असे म्हणून हाताबुक्यांनी मारहाण केली, डोक्याजवळ जखमी केले आणि दमबाजी केली. त्यावरुन देवपूर पोलिसांनी मधुकर जगन्नाथ गर्दे, तुषार मधुकर गर्दे आणि विनोद पांडुरंग गर्दे रा.जयहिंद कॉलनी, देवपूर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.