जगदीश कवडीवाले : यावलला आरोग्य तपासणी शिबिर
यावल- बँकिंग क्षेत्रात काम करत असतांना बँकींगसोबत सभासदांचे हित जोपासणे अगत्याचे आहे. याच अनुषंगाने सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवित सभासदांच्या कल्याणकारी योजना राबवित आहे, असे प्रतिपादन श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी येथे केले. ते बँकेतर्फे आयोजित सभासद आरोग्य तपासणी शिबिरात बोलत होते. श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक व गोदावरी फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने शहरात बालसंस्कार विद्या मंदिरात सभासदांसाठी मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी सुमारे 228 सभासद रुग्णांची तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते तपासणी करण्यात आली. शिवाय सभासद रुग्णांना मोफत औषधीही वितरीत करण्यात आली.
यांनी केले सहकार्य
यावेळी ह्रदयरोग, मूत्ररोग, लिव्हर, मधुमेह, किडनी, स्त्री रोग, अस्थिरोग, पचनसंस्था आदी विविध तपासण्या तज्ञ डॉक्टरांमार्फत शिबिरात करण्यात आल्या. शिबिरात गोदावरी फाऊंडेशनचे न्यूरो सर्जन डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.पाराजी बच्चेवार, डॉ.पंडीत पवार, डॉ. मधुकर पवार, डॉ.शुभांगी चौधरी, डॉ.हेमराज भाटी, डॉ.वृषभ पटेल यांनी सभासदर रुग्णांची तपासणी केली. प्रसंगी डॉ.उमेश कवडीवाले, डॉ.स्वाती कवडीवाले, डॉ.तुषार फेगडे, डॉ. श्रीकांत महाजन, बँकेचे अध्यक्ष शरद यावलकर, संचालक डॉ.सतीश यावलकर, हेमंत चौधरी, यशवंत सोनवणे, दिलीप नेवे, शांता वाणी, सुनीता गडे, सेवक वर्ग यांनी सहकार्य केले.