समता नगरात प्रौढाची आत्महत्या

0

जळगाव। समतानगरातील प्रौढाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अशोक देवराम रायमळे (वय-52) असे मयताचे नाव आहे.

अशोक रायमळे हे समतानगरात पत्नी सरला व मुलं रोहित व कुणाल यांच्यासोबत राहत होते. तर अशोक हे गवंडी काम करीत होते. गुरूवारी अशोक रायमळे यांनी घरात कुणी नसतांना घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफ2ास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी रोहित हा गवंडी कामावरून घरी आल्यानंतर दरवाजात आतून बंद असल्यामुळे त्याने घराचा पत्रा उचकवून पाहिले असता त्यांना वडील अशोक हे छताला गळफास घेतले दिसले. यानंतर त्याने आरडा-ओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत दरवाजा तोडला. यानंतर काहींनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आत्महत्तेची माहिती दिल्यानंतर पोलिस कर्मचारी सुधाकर शिंदे व किरण धनगर यांनी लागलीच घटनास्थळ गाठत नागरिकांच्या मदतीने मृतदेहास खाली उतरविले व घटनेचा पंचनामा केला. यानंतर अशोक रायमळे यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.