समन्वय ठेवून नियोजित वेळेत अधिकारीवर्गाने कामे पुर्ण करा

0

जळगाव । जिल्ह्यात ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचयतीचे निवडणूक विषयक कामकाज समनवय व सुसंवाद ठेवून अधिकारी-कर्मचार्‍यांनी नियोजित वेळेत पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी आज येथील मंगलम सभागृहात आयोजित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका प्रभाग रचना मार्गदर्शक प्रशिक्षणास उपस्थित अधिकारी कर्मचार्‍यांना केले. यावेळी मंचावर जळगाव प्रांताधिकारी जलज शर्मा, पाचोरा प्रांताधिकारी मनिषा खत्री, उपजिल्हाधिकारी मनोज चौधरी, भुसावळ प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, अमळनेरचे प्रांताधिकारी संजय गायकवाड, जि.पचे अतिरिक्त सीईओ संजय मस्कर उपस्थित होते.

वार्ड रचना करतांना जबाबदारीने अचूक करा
वार्ड रचना करतांना जबाबदारीने अचूक काम करा आपण आज केलेले चांगले काम भविष्यात उपयुक्त ठरत असते. अशा अचूक चांगल्या कामांमुळे भविष्यातील कामांतील अडचणी दूर होत असतात. सार्वत्रिक निवडणूकांचे काम केवळ कोणत्या एका विशिष्ट विभागाचे नसून हे सामुहिक काम आहे. निवडणूका यशस्वी करणे ही सामुहिक जबाबदारी आहे.

ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे
उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील मागदर्शन करतांना सांगितले की, जिल्ह्यात सुमारे 230 ग्रामपंचायतीची मुदत ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत संपत असून येथे निवडणुक घेतली जाईल. ग्रामपंचायतीचे वार्ड रचना करण्यासाठी आयोगाने सूचविलेल्या संगणक आज्ञावलीचा वापर करुन नकाशे तयार करावयाची आहे.