जळगाव । मु.जे. महाविद्यालय परीसरातील समर्थ कॉलीनीत राहणार्या 19 वर्षीय अल्पवयीन मुलगा गुरूवारपासून कोल्हेनगर परीसरातून गायब झाल्याची तक्रार मुलाच्या वडीलांनी रामानंद पोलिस स्थानकात दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथील रहिवासी ह.मु. मु.जे.महाविद्यालय परीसरातील समर्थ कॉलनीत राहणार्या ऋषीकेश उर्फ केतन संजय पाटील (वय-19) हा गुरूवार हा कोल्हे नगर परीसर भागातून रामानंद पोलिस स्टेशन समोरून कोठेतरी निघून गेला असल्याची तक्रार संजय राजाराम पाटील यांनी दिली. या बाबत पुढीत तपास पो.कॉ. काशिनाथ कोळंबे करीत आहे.