समर्थ पुणे परिवाराची दिनदर्शिका प्रकाशित

0
पुणे : पर्वती, शनिवार वाडा, अटक किल्ला, रायगड, सिंधुदुर्ग, रावेरखेडी अशा ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवत पेशव्यांच्या पराक्रमाची आठवण समर्थ परिवाराच्या दिनदर्शिकेतून होत आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी केले.
समर्थ पुणे परिवाराच्या वतीने सारसबाग येथे मंगळवारी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.उदयसिंह पेशवा, सुधीर गाडगीळ, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव, रमेश भिगवत, जगन्नाथ लडकत, चित्तरंजन गायकवाड, प्रकाश देवकर, अविनाश बडदे, प्रकाश काब्दुले आदी उपस्थित होते.