समस्या सोडविण्यासाठी महापौरांचे आमदारांना पत्र

0

जळगाव। काही दिवसांपूर्वी खासदार ए. टी. पाटील व आमदार सुरेश भोळे यांनी शहरातील समस्याबाबत महापालिकेतर्फे त्यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. खासदार व आमदार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महापौर नितीन लढ्ढा यांनी आमदार भोळे यांना सोमवारी वेगवेगळ्या पत्रांद्वारे केली आहे. महापौर लढ्ढा यांनी या पत्रात शहरातील समस्यांचे जाणीव करून देऊन आमदार भोळे यांची मदत मागीतली आहे. यात त्यांनी हुडको कर्ज, मेहरूण तलाव विकास निधी, गाळे हस्तांतरण याबाबत आमदार भोळे यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.

हुडको एकरकमी परफेडचा प्रस्ताव : हुडकोकडून तात्कलीन नगरपालिके घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त रक्कम महापालिकेने परत फेड केली आहे. महापालिकेने हुडकोकडे शासनाच्या शिफारसह एकरकमी कर्ज परतफेडीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हुडको कर्जाची एकरकमी परतफेडच्या प्रस्तावाबाबत हुडकोचे अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यासह शासनस्तरावर बैठकीचे आयोजन करण्यास सहकार्य करण्याची मागणी केली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मेहरूण तलावाच्या विकासासाठी निधीचा प्रस्ताव महापालिकेने जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे. 33 कोटी 74 लाख रूपयांचा प्रस्तावास सहकार्य करून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती महापौर लढ्ढा यांनी आमदार भोळे यांना केली आहे.

गाळे हस्तांतरण मार्ग काढा
महापलिका मालकीचे करार मुदत संपलेले गाळे हस्तांतरणाचा विषय शासनस्तरावर 2012 पासून प्रलंबित असून महापालिकेचे भाडे स्वरूपात मिळणारे उत्पन्न पुर्णपणे थांबले आहे. यामुळे महापालिकेच्या विकास कामांवर विपरीत परिणाम होत असल्याचे महापौर लढ्ढा यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आमदार सुरेश भोळे यांनी शासनस्तरावर निर्णय घेतांना योग्यते सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.