तळोदा । येथे महात्मा फुलें समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने एक दिवशी कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी, प्राप्त कौशल्याच्या व्यावसायिकरणात उपयोग व्हावा या हेतूने समाजकार्य महाविद्यालयात एकदिवसीय विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत मुंबई येथील प्रा.विजय जाधव व भीमराव खेत्रे यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी पाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण आहेत. ते शोधने गरजेचे आहे. तसेच सातपुडा परिसरात विविध समस्यां आहेत. समस्यां मांडण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
कलागुणांचे सादरीकरण
आजही या समाजात अंधश्रद्धेचा पगडा आहे. तो नष्ट होणे गरजेचे असल्याचे प्रमुख मार्गदर्शकांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.एम.माळी हे होते. कार्यशाळेला संस्थेचे सदस्य सुधीर माळी यांची प्रमुख उपस्थिती लावली. समाज प्रबोधनात्मक भित्ती फलके, सामाजिक गीते तयार करणे, परिसरानुसार जनजागृतीचे फलके कश्या पद्धतीने बनवावे, सामूहिक गीते, समाज प्रबोधनात्मक गीते, तयार करणे, तसेच माहिती पट, शॉर्ट फिल्म्स तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर आदिवासी गीतांवर विद्यार्थी शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी नृत्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी खरताडे यांनी तर आभार रामचंद्र परदेशी यांनी मानले. प्रास्ताविक प्रा.निलेश गायकवाड यांनी केले. यावेळी प्रा.उषा वसावे, प्रा.नितीन तायडे, प्रा.रामचंद्र परदेशी, प्रा.प्रमोद जाधव आदींसह शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते.