समाजसेवेचे कार्य निरंतर सुरुच ठेवण्याची गरज

0

भुसावळ  । जगभरात रोटरी क्लबतर्फे ठिकठिकाणी विविध समाजपयोगी उपक्रम राबि वले जातात तसेच उपक्रम आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात सुरू असून रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फेही चांगले उपक्रम राबविले जात असुन समाजसेवेचे कार्य निरंतर सुरुच ठेवावे, असे प्रतिपादन रोटरीचे जिल्हा प्रांतपाल डॉ.के.एस. राजन यांंनी केले. ते रोटरी भवनात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर उपप्रांतपाल विद्यमान भंडारी, भुसावळ अध्यक्ष डॉ.गिरीष कुळकर्णी, सचिव जी.आर. ठाकुर, विदेशी अतिथी गुलेम मार्टीन(स्पेन), मेलीनी ग्रानेक(फ्रान्स) उपस्थित होते.

विविध उपक्रमांची दिली माहिती

 यावेळी प्रांतपाल डॉ.राजन पुढे म्हणाले की, रोटरीच्या माध्यमातून मानवतावादाचे मोठे कार्य उभारले जाऊ शकते. विश्वबंधूता, पर्यावरण, आरोग्य, अन्न, शेती, शिक्षण, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात रोटरी सदस्यांनी कार्य करून सामाजिक उन्नतीसाठी सदैव तत्पर राहावे, असे ते म्हणाले. भुसावळ रोटरी क्लबतर्फे राबविण्यात आलेल्या  वृक्षारोपण, रक्तदान, अवयवदान जनजागृती, स्वच्छता अभियान आदींची माहिती डॉ.नारायण आर्वीकर यांंनी प्रसंगी दिली.

यांची उपस्थिती 

वर्धमान भंडारी यांनी  मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन हेमंत नाईक तर प्रदीप दवे यांंनी आभार मानले.   रोटरीचे राजीव सहगल, डॉ.रवींद्र शुक्ला, आशिष अग्रवाल, सारंग चौधरी, विकास कात्यायनी, अशोक काबरा, ऋषी शुक्ला, सतीश अग्रवाल, राजेश अग्रवाल, प्रकाश फालक, राजेश जोशी, धर्मेंद्र मेंडकी, तेजस नवगाळे, पोपटराव पाटील, विसपुते, प्रकाश ठाकूर, किरण ठाकूर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मनोज गुलईकर, प्रथमेश गुलईकर यांंनी परिश्रम घेतले.