रावेरात अग्रवाल समाजातर्फे श्री महाराजा अग्रसेन चौक स्तंभाचे अनावरण
रावेर- अग्रवाल समाजाने सर्व क्षेत्रात आपले नावलौकीक करावा, प्रत्येक समाज बांधवाला आपले कुटुंब समजून त्याला प्रोत्साहन द्या, कोणाला मागे राहु देऊ नका, समाजाच्या एकजुटीने भावी पिढीचा उध्दार होतो, आपसातले मतभेद विसरून समाज विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन अग्रवाल समाज सेवादलाचे अध्यक्ष किरण अग्रवाल यांनी येथे केले. शहरातील मध्यवर्ती पोष्ट ऑफिस जवळ समस्त अग्रवाल समाजातर्फे श्री महाराजा अग्रसेन चौक स्तंभाचे अनावरण रविवारी झाले. याप्रसंगी अग्रसेन भवनात झालेल्या कार्यक्रमात अग्रवाल बोलत होते.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
राज्यस्तरीय अग्रवाल संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, संमेलनाचे महामंत्री गोपाल बाबू अग्रवाल, उषा अग्रवाल, युवा अग्रवाल अध्यक्ष मुकेश गोयंका, अग्रवाल समाज जिल्हाध्यक्ष पवन मित्तल, जिल्ह्याचे महामंत्री डॉ.सुरेश अग्रवाल, रावेर नगरसेवक प्रकाश अग्रवाल, नगर सेविका संगीता अग्रवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
कार्यक्रमास यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला श्रीरामशेट अग्रवाल, संजय अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, आशिश अग्रवाल, मुन्ना अग्रवाल, राजेश अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, प्रदीप मालेगावकर, पारस अग्रवाल, संतोष अग्रवाल, अर्पित अग्रवाल, तुषार अग्रवाल, किर्ती अग्रवाल, महिला अध्यक्षा अनिता अग्रवाल, उपाध्यक्ष मनीषा अग्रवाल, सचिव प्रतीक्षा अग्रवाल, जीवन अग्रवाल, गौरव अग्रवाल, शैलेश अग्रवाल, सुनील अग्रवाल, यश अग्रवाल, बाबू पहेलवान, शीतल पाटील, भूषण अग्रवाल, दिलीप अग्रवाल, हितेश अग्रवाल, रोहीत अग्रवाल, भारती अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक विशाल अग्रवाल यांनी तर सूत्रसंचलन दीपक अग्रवाल व आभार राजेश अग्रवाल यांनी मानले.