तेज निवळीकर : शिक्षक दिन उत्साहात साजरा
धायरी । समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनाच देव मानून त्यांना घडवावे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक प्राध्यापक तेज निवळीवर यांनी सांगितले.
धायरी येथील बंडोेजी खंडोजी चव्हाण महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षणाचे औपचारिक, अनौपचारिक, सहज शिक्षण हे प्रकार आहेत. शिक्षकाने विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता जीवनाभिमुख शिक्षण द्यावे. सध्याच्या समाजजीवनात वस्तूला महत्त्व येत चालले आहे. पण माणसांना महत्व देणे गरजेेचे आहे, असे निवळीकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सोपन उर्फ काका चव्हाण, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, खंडोजी चव्हाण, भीमराव चव्हाण, प्रा. जी.बी. विद्यासागर, संचालिका सुनीता चव्हाण, मुख्याध्यापक विकास कुंभार, राजेंद्र पाटील, विलास खाडे, मदन सूर्यवंशी आदी उपस्थित होते. संस्थेच्या सर्वच शाळांतील दोनशेहून अधिक शिक्षक उपस्थित होते. काका चव्हाण यांनी सरहद्द मंडळाच्या कर्णबधिर निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला.