भास्कर सदाकळे यांनी केले मार्गदर्शन
चिंचवड : समाजाची प्रगती व्हायची असेल तर विज्ञान दृष्टीकोन असावयास हवा, असे प्रतिपादन विज्ञान बोध वाहिनीचे संयोजक भास्कर सदाकळे यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने फिरते थ्री डी नभांगण, खगोलविज्ञान आणि जादूटोणाविरोधी कायदा याविषयी सखोल माहिती व्हावी यासाठी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, सी.ई.ओ. प्रा. राजेंद्र कांकरिया, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता ट्रव्हीस, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. वनिता कुर्हाडे, अंधश्रध्दा निर्मूलन राज्यसचिव मिलिंद देशमुख, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सुभाष सोळंकी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम नलावडे, राजेश सोकटे, सागर फाळके उपस्थित होते.
विज्ञानावर आधारित अंधश्रद्धा
सदाकळे यांनी विज्ञानाच्या गमतीजमती सांगताना पुढे म्हणाले की, बुवा बाबाच्या दरबारात हातचलाखी, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर अंधश्रध्दा करतात. अशांना समाजातील झुंडीच्या झुंडी अशा बुवाच्या चरणी नतमस्तक होतात. त्यात महिलांची गर्दी जास्त असते. मुद्दाम करणारी ढोंगी माणसे आपल्याला ओळखता आली पाहिजे. सी.ई.ओ.डॉ.राजेंद्र कांकरिया व मिलिंद देशमुख म्हणाले की, ग्रह, तारे, विविध, खगोलीय आविष्कार दाखविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खगोलविज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती नेहमीच अग्रेसर राहिली आहे. हवा भरुन उभ्या केलेल्या या नभांगणात भव्य आकाश आणि वास्त अंतरिक्षाचा अनुभव विद्यार्थ्यांना यावा यासाठभ अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. थ्रीडी दृष्यपटात रात्रीच्या आकाशाचे रहस्य, कृष्णविवरे, वेध मंगळ मोहिमेचा, सुर्य, विश्वाचे अंतरंग, तार्याचे जीवनाचे रहस्या आदीची माहिती देण्यात आली.