गाडेगावला वै.ह.भ.प. तोताराम महाराज यांच्या समाधीस्थळी लेवा पाटीदार समाजाच्या पदाधिकारी व मान्यवरांची बैठक
भुसावळ- तळागळातील समाजबांधवांना रोजगार व व्यवसायवृद्धीसाठी जमेल तेवढी मदत केल्यास नक्की समाजाची आर्थिक प्रगती उंचावल्याशिवाय राहणार नाही, समाजातील होतकरू, गरजूंसाठी रोजगार व उद्योजक मेळावा हा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत माजी सरपंच प्रल्हाद भारंबे यांनी व्यक्त केले. जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे वै.ह.भ.प. तोताराम महाराज यांच्या समाधीस्थळी लेवा पाटीदार समाजाच्या पदाधिकारी व मान्यवरांची बैठक झाली. प्रसंगी भारंबे बोलत होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार्या भव्य उद्योग, व्यवसाय, करीअर मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यासंदर्भात बैठकीचे नियोजन करण्यात आले.
यांची बैठकीस होती उपस्थिती
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रल्हाद भारंबे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजेश नेहते, निता वराडे, विकास नेहेते, सरपंच सुलभा भारंबे, राजु राणे आदी उपस्थित होते. श्री संत तोताराम महाराजांच्या मुर्ती व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बैठकीची सुरुवात झाली . यावेळी राजेश नेहेते यांनी नाशिक येथे घेतलेल्या रोजगार मेळाव्याचे अनुभव कथन केले तर विश्वनाथ वारके यांनी यांनी आजची परीस्थितीवर मार्गदर्शन केले. प्रा.धीरज पाटील यांनी शिक्षणात होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल, नोकरी मिळवण्यासाठी युवकांकडून केले जाणारे प्रयत्न तसेच ग्रामीण भागातील युवक नोकरी मिळवण्यात अपयशी का होतो? याबद्दल माहिती दिली. या वेळी 5 मे रोजी घेण्यात येणार्या नोकरी मेळाव्यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
राज्यभरातील समाजबांधवांची हजेरी
माजी सरपंच प्रल्हाद भारंबे, राजेश नेहते, निता वराडे, विकास नेहेते, सरपंच सुलभा भारंबे, शारदा भारंबे, राजु राणे, योगेश कोलते, विश्वनाथ वारके, सुशिल नेहते, गौरव राणे, संदीप राणे, हेमंत भंगाळे, प्रकाश वराडे, निलेश वाणी, निता वराडे, ऍड. प्रकाश पाटील, वसंत कोलते, मारुती भिरुड, नरेंद्र पाटील, शरद भारंबे, हरी राणे, डॉ. किशोर भारंबे, रामदास राणे, अमोल पाटील, रामदास वारके, विनय बर्हाटे, महेश पाटील, दिपक पाटील, सागर भंगाळे, अमोल बोरले, राजेश भारंबे, चेतन भंगाळे, विनय भारंबे, जगदीश भारंबे, दिपक वराडे , प्रदीप भारंबेसह भुसावळ, नेरी, जळगाव, नाशिक, इंदौर, पुणे, मुंबई, सुरत, चितोडा, नशिराबाद, जामनेर, मोताडा, निपाणा येथून समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा.धीरज पाटील यांनी तर आभार योगेश कोलते यांनी मानले. दरम्यान, नोकरी मेळाव्यासाठी गरजु उमेदवारांनी आपली माहिती, बायोडाटा 9270065775 या क्रमांकावर व्हॉट्सअप करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.