समाजातील दृष्ट प्रवृत्तींना धडा शिकवावा : माजी मंत्री एकनाथराव खडसे
भुसावळ शहरात रावण दहन : जय मातृभूमी मंडळातर्फे टीव्ही टॉवर मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन
Let’s destroy the Ravana-like tendencies in the society : Former Minister Eknathrao Khadse भुसावळ : समाजात जेव्हा-जेव्हा अपप्रवृत्ती वाढतात तेव्हा त्यावर सत्प्रवृत्ती विजय मिळवतात. रावण-रुपी दृष्य प्रवृत्तींवर विजय मिळविण्यासाठीही प्रभू रामाने अवतार घेतला. समाजातही अशा अनेक रावण रुपी दृष्टप्रवृत्ती आहेत, आपण सर्व एकत्र येवून अशा दृष्टप्रवृत्तींचा विनाश करुया, असे आवाहन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. जय मातृभुमी मंडळातर्फे बुधवारी सायंकाळी टीव्ही टॉवर मैदानावर झालेल्या रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, माजी आमदार दिलीप भोळे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, उद्योजक मनोज बियाणी, जय मातृभूमी मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रा.सुनील नेवे, माजी नगरसेवक निर्मल कोठारी आदी उपस्थित होते. मातृभूमी मंडळाने आयोजितत केलेल्या रावण दहन उत्सवात मध्यप्रदेशातील हरदा येथील आकर्षक आतषबाजी यंदाच्या रावण उत्सवातील आकर्षण ठरली.
नागरीकांची प्रचंड गर्दी
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते रावण, आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते कुंभकर्ण तर उद्योजक मनोज बियाणी यांच्या हस्ते मेघनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. कोरोनामुळे सलग दोन वर्षाच्या कालखंडानंतर रावण दहन उत्सव होत असल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते यांनी तर सूत्रसंचलन व आभार अॅड.निर्मल दायमा यांनी मानले.
कोरोनारुपी रावणावर विजय मिळवला
रावणरुपी अनेक प्रवृत्ती या समाजात आहेत. जग, देश, राज्य व शहरात देखील असलेल्या अशा रावणरुपी प्रवृत्तींचा आपण सर्वांनी एकत्र येवून संहार करायला हवा. आपण दरवर्षी या प्रतीात्मक पुतळ्याचे दहन करतो मात्र समाजातील अशा दृष्ट प्रवृत्तींनाही धडा शिकवला गेला पाहिजे. देशानेही कोरोनारुपी रावणावर विजय मिळवला आहे. आपल्या देशाने अनेक गोरगरीब व अविकसीत देशांना लसींचा पुरवठा करीत पुरवठा केला, ही गौरवाची बाब असल्याचे यावेळी आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या अध्यक्षा संगीता बियाणी, सामाजिक कार्यकर्ते गिरीष महाजन, देवेंद्र वाणी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, अॅड. बोधराज चौधरी, उद्योजक विजय चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रवींद्र पाटील, शिवसेनेचे बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक संतोष त्र्यंबक चौधरी, अॅड.आर्शिया शेख, पितांबर टेकवानी, सुरजीत गुजराल, पुरुषोत्तम नारखेडे, बाबा सुनील उदासी आदी उपस्थित होते.